
कागल : तालुक्यातील सिद्धनेर्ली नदीकिनारा दुधगंगा नदी पुलावर झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादा ज्ञानू पाटील (वय ३७, रा. करगणी, ता. आटपाडी, जि. सांगली) हे काल रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. MH-10-EH-2803) वरून बाळूमामा आदमापूर येथून गावी परतत होते. त्यावेळी सिद्धनेर्ली नदीकिनारा येथील दुधगंगा नदीच्या पुलावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत दुचाकी पुलाच्या लोखंडी ग्रीलला अडकली आणि पाटील खाली नदीपात्रातील खडकावर पडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी फिर्यादी नितीन भिमराव खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून कागल पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.