
कोल्हापूर : दि. १७/१०/२०२५ ते दि. २३/१०/२०२५ रोजी अखेर कालावधीत मोठ्या प्रमाणात दिपावली सण साजरा होत आहे. दिपावली सणाचे करीता नागरीक कपडे तसेच इतर वस्तू खरेदी करणेकरीता महाद्वार रोड तसेच राजारामपूरी परिसरातील दुकांनामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. दिपावली सणा करीता फळविक्रेते, हातगाडीवाले, रांगोळी विक्रेते तसेच दुकानदार आपले दुकानासमोर मंडप घालून साहित्याची विक्री करीत असतात, नागरीक दीपावली सणा करीता साहित्य घेणेसाठी दुकानामध्ये गेले नंतर आपली वाहने मंडपाचे बाहेर लावून जात असलेमुळे सदर ठिकाणी वाहतूकीची कोंडी होवून वाहतूक विस्कळीत होत असलेने मा. योगेश कुमार, पोलीस अधीक्षक, यांनी कारवाई बाबतचे आदेश दिले.
दिनांक १७.१०.२०२५ रोजी रहदारीस अडथळा ठरणा-या हातगाडीवाले, फळविक्रेते, रस्त्याचे साईड पटटीचे ठिकाणी स्टॉल लावणारे तसेच दुकानाचे बाहेर ठेवलेले डिजीटल बोर्ड यामुळे वाहतूकीची कोंडी होत असते. या करीता शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून दोन पथके तयार करण्यात आली आहेत.

पथक क्रमांक – १
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे व ५ पोलीस अंमलदार दुचाकी क्रेन, चारचाकी क्रेन असे नेमून त्यांचेकरवी सीपीआर हॉस्पीटल चौक, माळकर तिकटी, लुगडी ओळ, मिलन हॉटेल चौक, आईसाहेब महाराज पुतळा, फोड कॉर्नर, कोंडाओळ, स्वयंभू गणेश मंदीर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पापाची तिकटी, पानलाईन, गंगावेश, रंकाळा स्टैंड, रंकाळा टॉवर,
पथक क्रमांक – २
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव व ५ पोलीस अंमलदार दुचाकी क्रेन, चारचाकी क्रेन असे नेमून त्यांचेकरवी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भवानी मंडप, बिंदू चौक, आझाद चौक, उमाटॉकीज, पार्वती टॉकीज, एम.जे. वॉईन्स समोर, जनता बाजार चौक, अग्नेमुखीय मारुती मंदीर, व्ही.टी. पाटील भवन ते बाईचा पुतळा, जनता बाजार ते पारीख पुल.

शहर वाहतूक शाखा कोल्हापूर यांचे वतीने दोन पथका मार्फत फेरीवाले, हातगाडीवाले यांना पांढरे पट्ट्याचे आत मध्ये गाडी लावून वाहतूकीस अडथळा होणार नाही याबाबतच्या सूचना देवून सदरच्या फळविक्रेते तसेच हातगाडया रस्त्याचे कडेला लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. तसेच रस्त्यामध्ये बेशीस्त पार्कींग करून वाहतूकीस अडथळा करणारे मोटर सायकल चालक व चारचाकी वाहन चालकांना पीए सिस्टीमद्वारे अनाऊन्स करुन वाहने योग्य रितीने पाकींग करणे बाबत सूचना दिल्या तसेच आवश्यकतेनुसार मोटर वाहन कायदयाखाली १८ वाहनांवर ई चलानद्वारे कारवाई करुन १३,५००/- इतके तडजोड शुल्क आकारण्यात आले आहे.
वरील प्रमाणेची कारवाई कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील, शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, शहर वाहतूक शाखा कोल्हापूर कडील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. सदर कारवाई मध्ये सातत्य ठेवण्यात येणार आहे.

