
कागल : ऊसतोडणी हंगामाच्या आमिषाने शेतकऱ्याची तब्बल १५ लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार बानगे (ता. कागल) येथे उघडकीस आला आहे. विशाल नारायण पाटील (वय २६, रा. माळवाडी, बानगे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी राणु पवार (रा. कुऱ्हाडी, जिंतूर, जि. परभणी) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने १० कोयते (२०ऊसतोडमजूर ) पुरवतो, असे सांगून फिर्यादीकडून ९ लाख 50 हजार रुपये रोख तसेच ट्रॅक्टर आणि ट्रॉली मिळून १५ लाखांची फसवणूक केली. विश्वास संपादन करून केलेल्या या फसवणुकीचा कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढील अधिक तपास कागल पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार करीत आहेत