
कोल्हापूर : वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या अतिक्रमण व बेशिस्त पार्किंगविरोधात वाहतूक नियंत्रण शाखा आणि महानगरपालिका पथकाने संयुक्त कारवाई करत मोठी मोहीम राबवली. सीपीआर चौक, भवानी मंडप, बिंदू चौक, जेलरोड ते मिलन हॉटेल परिसरात दुकानदारांनी दुकानासमोर ठेवलेले स्टँडिंग बोर्ड, पायाड, बाकडी, टेबल, चप्पल बॉक्स अशी एकूण ५४ अडथळक वस्तू जप्त करण्यात आल्या. तसेच रस्त्याकडेला चुकीच्या पद्धतीने ठेवलेल्या दुचाकी चारचाकींवर टोईंग कारवाई झाली.
दरम्यान, मलबार हॉटेल चौक, गोखले कॉलेज, ताराराणी सिग्नल, सायबर चौक आदी गर्दीच्या ठिकाणी विशेष मोहिमेत मोटार वाहन कायदा उल्लंघन करणाऱ्या २६६ वाहनचालकांकडून रु. २ लाख 4 हजार ४०० इतका दंड वसूल करण्यात आला.

या कारवाईसाठी चार क्रेन, पेट्रोलिंग बाईक, एक अधिकारी आणि २५ अंमलदारांचा सहभाग होता. पुढील काळातही अशा मोहीमा अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा इशारा वाहतूक शाखेने दिला असून दुकानदारांनी पादचारी मार्गात अडथळा होईल अशी रचना टाळण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव व पोलीस अंमलदार यांच्या पथकाने करण्यात आली आहे.