
कोल्हापूर : कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवून कार्यकर्त्यांना संधी देवू. महायुतीतील सर्वच पक्षाचा मान सन्मान ठेवू. जिल्ह्यातील १० पैकी १० विधानसभा सदस्य मतदारांनी निवडून देत महायुतीला कौल दिला आहे. या मतदारांनी महायुती म्हणून दिलेल्या मतांचा अनादर कोणताही महायुतीतील पक्षाकडून होणार नाही याची काळजी घेवूया. महायुती म्हणून एकत्रित लढूया, असा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.