आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर मध्ये भाजपा महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक

Share News

कोल्हापूर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल कोल्हापूर मध्ये भाजपा महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक हॉटेल अयोध्या याठिकाणी पार पडली.

बैठकीमध्ये निवडणूक रणनिती, संघटनात्मक मजबुती, जागावाटप तसेच विजयासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना नाम.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले शक्य असल्यास 68 जागांवर युती करा त्याचबरोबर जास्तीत जास्त घटक पक्षांना एकत्र घेऊन आगामी जिल्हा परिषद लढणार असल्याचे सांगत या युतीमधून विरोधकांना फायदा होणार नाही याची दक्षता घेणार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी,युवक,महिला यांच्यासाठी राबवण्यात आलेल्या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही महायुतीला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. महानगरपालिकेपेक्षाही मोठा विजय जिल्हा परिषदेमध्ये महायुतीला मिळेल. कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये, वाड्यावर विकास गंगा पोहोचवण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार चंद्रकांतदादांनी केला.
या प्रसंगी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक, माजी मंत्री विनय कोरे, आमदार राहुल आवाडे, अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, समरजितराजे घाटगे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, शौमिका महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हळवणकर, संजयबाबा घाटगे, महेश जाधव यांच्यासह महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!