
कागल : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कागल तालुक्याच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात मिनाक्षी अविनाश शिंदे यांनी क. सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून, तर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी आर कांबळे मौजे, सांगाव पंचायत समिती मतदार संघातुन, दिनकर कांबळे यांनी यमगे पंचायत समिती मतदारसंघातून आणि MD कांबळे यांनी साके पंचायत समिती मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या कागल तालुका संपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कागल तालुका अध्यक्ष मा. चंद्रशेखरजी कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज दाखल कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना चंद्रशेखरजी कोरे म्हणाले की, “सामान्य जनतेचे प्रश्न, दलित-वंचित समाजाचा आवाज आणि सर्वसमावेशक विकासासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ठामपणे मैदानात उतरली आहे. कागल तालुक्यातील सर्व जागांवर पक्ष ताकदीने निवडणूक लढवणार आहे.”
कार्यक्रमादरम्यान पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ‘जय भीम’, ‘रिपब्लिकन पार्टी जिंदाबाद’ अशा घोषणा देत उमेदवारांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ने कागल तालुक्यात निवडणूक लढतीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
या निर्णायक टप्प्यावर पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघपणे काम करत असून, येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे साहेब, किरण सिद्धनेर्लीकर , विशाल चिखलीकर, नागेश गिरी, तानाजी सोनाळकर, सचिन कांबळे, सतिश कांबळे यांच्या सह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..