आपल्या विश्वासाच्या जोरावरच मी निवडणूक लढवत आहे ; ॲड.शैलजा चव्हाण

Share News

कोल्हापूर : कोल्हापूर बार असोसिएशन येथे झालेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीच्या प्रचार सभेला वकिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सभेत बोलताना बार असोसिएशनच्या उमेदवार शैलेजा चव्हाण यांनी वकिलांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, “प्रचार सभेला उपस्थित राहून सर्व वकिलांनी माझ्या उमेदवारीला दिलेला प्रतिसाद पाहता मी भारावून गेले आहे. वकिल बांधवांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम पाहून मला अतिशय आनंद झाला असून त्यामुळे माझ्यावर अधिक जबाबदारी वाढली आहे.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “वकिलांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी मी ठामपणे आवाज उठवणार आहे. वकिलांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे.”
यावेळी त्यांनी उपस्थित वकिलांना आवाहन करताना सांगितले, “आपल्या विश्वासाच्या जोरावरच मी ही निवडणूक लढवत आहे. त्यामुळे माझा सिरीयल नंबर 26 लक्षात ठेवून मला प्रथम पसंतीचे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे.”
प्रचार सभेला शहरातील मोठ्या संख्येने वकिल उपस्थित होते. सभेमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!