कोल्हापूर येथे शक्तीपीठ विरोधी सर्वपक्षीय मेळावा पार पडला. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी व नागरीक या महामार्गाला कडाडून विरोध..

Share News

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात वारणा नदीवर ऐतवडे जि. सांगली ते बहिरेवाडी हा ६ ते ७ किलोमीटरचा कमीत कमी २० फूटापासून ५० फूटापर्यंत भराव पडणार आहे. त्याचबरोबर केर्ली ता. पन्हाळा ते शिरोली दुमाला ता. करवीर याठिकाणी १७ किलोमीटर अंतरावर २० फुटापासून ते ७० फुटाचा भराव पडणार आहे.

   कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा , कासारी , पंचगंगा, भोगावती , तुळशी नदी ,कुंभी नदी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन महापुराची परिस्थिती निर्माण होणार आहे. यामुळे ६० ते७० गावांमधील जनतेला याचा फटका बसणार आहे. 

    सह्याद्री घाटमाथ्यावरून पावसाळ्यात नद्यांमध्ये येणारे पाण्याचा प्रवाह हा ताशी ५० किलोमीटर वेगाने असणार आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या भरावास हे पाणी तटल्याने पाण्याला फुग निर्माण होवून मोठ्या प्रमाणात बागायती जमीनीचे नुकसान होणार आहे

कोल्हापूर जिल्हा हा साखर उद्योगाचा जिल्हा म्हणून संपुर्ण देशात परिचित आहे. या महामार्गासाठी पिकाऊ जमीन संपादित होणार आहे. त्याबरोबरच पाण्याचा निचरा जास्त दिवस झाल्याने मोठ्या  प्रमाणात  ऊसाच्या उत्पन्नात घट होणार आहे. यामुळे साखर कारखानदारी संकटात येणार आहे.

 शक्तीपीठ महामार्गाचा एका किलोमीटरचा खर्च हा जवळपास ११७ कोटी रूपये असणार आहे. या प्रकल्पातून देवेंद्र फडणवीस यांना ५० ते ६० हजार कोटींचा ढपला पाडायचा आहे. 

  या महामार्गात सर्वाधिक पिकाऊ जमीन संपादित होणार आहे .शक्तीपीठ महामार्गाला १३ जिल्ह्यातून कडाडून विरोध होवू लागले आहेत. लोक रस्त्यावर उतरून आया बहिणींना घेऊन विरोध करू लागले आहेत. 

        या मेळाव्याला आमदार सतेज पाटील , मा. आमदार संपतबापू पाटील , के पी पाटील , राजू आवळे , राजीव आवळे , संपत देसाई , अजित पोवार , गिरीश फोंडे , विजय देवणे , कॅा. अतुल दिघे , कॅा. उदय नारकर , चेतन नरके , राहूल देसाई , मनोज फराकटे , प्रकाश पाटील , धैर्यशील पाटील कौलवकर , ए वाय पाटील , शिवाजी मगदूम , विक्रांत पाटील , वैभव कांबळे, सुनिल शिंत्रे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!