
तळंदगे (ता. हातकणंगले) येथील शेताजवळ असलेल्या ओढ्यात एका अंदाजे ४० वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पाटील समीर आझम मुल्लानी (रा. तळंदगे) यांनी दिलेल्या माहितीवरून हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दिनांक ९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संग्राम यांदव यांच्या सरकार मळा नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेताच्या पश्चिम बाजूला असलेल्या ओढ्यात मृतदेह बेवारस अवस्थेत आढळला. मृतदेहावर माशा बसलेल्या होत्या आणि त्यातून दुर्गंधी पसरत होती. यावरून मृत्यूस काही काळ झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ. शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलीस निरीक्षक कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अद्याप मृताची ओळख पटलेली नाही.