
कोल्हापूर ता.11 : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिकची दोन पथकाद्वारे तपासणी आज करण्यात आली. हि तपासणी ताराबाई रोड, लक्ष्मीपूरी व शाहुपूरी परिसरातील दुकानांमध्ये करताना अंदाजे 400 किलो प्लॅस्टीकचा साठा या ठिकाणी आढळून आला. त्यामुळे या तीन व्यापाऱ्यांस महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येकी पाच हजार प्रमाणे पंधरा हजार रुपयांचा दंड करुन तो वसूल केला. यामध्ये पुजा प्लॅस्टिक, एस.बी.बिर्याणी व के.एस.स्पोर्टस या दुकानांचा समावेश आहे. महापालिकेच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. हि मोहिम प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. आजची ही कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील यांच्या सूचनेनुसार शहर समन्वयक हेमंत काशीद, मेघराज चडचणकर, विभागीय आरोग्य निरिक्षक नंदकुमार पाटील, विकास भोसले, आरोग्य निरीक्षक माधवी मसुरकर, सुशांत कांबळे, शुभांगी पोवार, ऋषिकेश सरनाईक, सुरज घुणकीकर, श्रीराज होळकर, स्वप्नील उलपे, शर्वरी कांबळे, नंदकुमार कांबळे, मुकादम व कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी व्यापा-यांस येथून पुढे प्लास्टिकचा वापर न करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. सर्वांनी सिंगल युज प्लॅस्टीकचा वापर टाळावा व कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहनही यावेळी महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
तरी महानगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व आस्थापना, व्यापारी व संस्था यांनी एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर बंद करावा. जर शहरामध्ये एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर करताना आढळल्यास त्या आस्थापना, संस्था व नागरीकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे.