
हातकणंगले : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली येथील शेतातील विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सिंधा रायसिंग वसावे (वय 27, रा. देसाई मळा, पट्टणकडोली) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांनी दीपक देसाई यांच्या शेतातील विहिरीत पडून प्राण गमावला.
ही घटना काल रात्रीच्या दरम्यान घडली. याबाबत मयत महिलेचे पती रायसिंग वसावे यांनी हुपरी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पोलीस करत आहेत.