कुपवाड – कृष्णा व्हॅली चेंबर आणि सांगली अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. सवांद मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सतीश मालू यांनी केले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, संस्थेचे संचालक रमेश आरवाडे, हरीभाऊ गुरव, अरुण भगत, हेमलता शिंदे, रागिणी पाटील, पांडुरंग रुपनर, राजगोंडा पाटील, बँकेचे उपाध्यक्ष श्रीपाद खिरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणाल्या की, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये सेवा व्यवसायासाठी 20 लाखापर्यंत आणि उत्पादन व्यवसायासाठी 50 लाखापर्यंतचे कर्ज देण्यात येत आहे. सदर कर्जावर ती 30 ते 35 टक्के पर्यंत सबसिडी मिळते. तरी जास्तीत जास्त उद्योजकांनी सदर योजनेसाठी अर्ज करावेत. यावेळी त्यांनी उद्योजकांना असे आवाहन केले की आपण जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करून शासनाच्या अनेक योजना आहेत त्या आपण सहजासहजी मिळवू शकतो, सामुहिक प्रोत्साहन योजना मिळवितना आपल्या उद्यिगांच्यासाठी मुद्रांक शुल्क माफ होते. सदर योजना मिळविण्यासाठी कोणत्याही शिक्षणाची अट नाही. तसेच महीलांच्यासाठी भरपूर योजना आहेत तरी सर्वांनी सदर योजनाचा जास्तीत जास्त उद्योजकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी बँकेने आजपर्यंतची जी कामे केली आहेत त्याची विस्तृत माहिती दिली यावेळी त्यांनी उद्योजकांना असे आवाहन केले की उद्योजकांना बँक नेहमीच मदत करीत असते यापुढच्या काळातही बँक आपणास सहकार्य करेल तरी बँकेच्या असणाऱ्या विविध योजनाचा आपण लाभ घावा असे आवाहन केले.
यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर यांनी सांगली अर्बन बँकेच्या असणाऱ्या विविध योजनांची चांगल्या पद्धतीने माहिती दिली. यावेळी विविध उद्योजकांनी मनोगते व्यक्त केली.
आभार अर्बन बँकेचे संचालक हणमंतराव पाटील यांनी मानले. यावेळी उद्योजक सदाशिव साखरे, संजय बेडगे, अमितकुमार रुपनर, अशोक कोठावळे, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत घाटगे, दिनेश पटेल, अरुण कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, व्यवस्थापक अमोल पाटील आदीसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.