औद्योगिक वसाहतीमध्ये महावितरण ३३/११ केव्हीचे सब स्टेशन लवकरच उभारणार – सतीश मालू.

सब स्टेशन उभे करण्याबाबत चर्चा करताना महावितरणच्या संचालिका नीता केळकर, संस्थेचे अध्यक्ष सतीश मालू, मिरज असो. माजी अध्यक्ष संजय अराणके एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेटकर

कुपवाड – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक ऑफिस सांगली येथे औद्योगिक वसाहतीमध्ये ३३/११ केव्हीचे नवीन सबस्टेशन उभारण्याबाबत बैठक झाली सदर बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संचालिका नीताताई केळकर, कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, संचालक रमेश आरवाडे, मिरज असो. माजी अध्यक्ष संजय अराणके, प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, महावितरणचे अधिक्षक अभियंता धर्मराज पेटकर, कार्यकारी अभियंता आप्पासाहेब खांडेकर, कोल्हापूर ऑफिसचे हसबे उपस्थित होते.

कृष्णा व्हॅली चेंबरच्या वतीने वांरवार महावितरण ऑफिसला औद्योगिक वसाहतीमध्ये सब स्टेशन उभे करण्याबाबत मागणी केली होती. त्यास अनुसरून दि. १२/०३/२०२४ रोजी झालेल्या बैठकीत कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये लठ्ठॆ कॉलेज समोरील मोकळ्या जागेत ३३/११ केव्हीचे तसेच मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये महावितरणसमोरील मोकळ्या जागेत ३३/११ केव्हीचे सब स्टेशन उभे करण्यात येणार आहे अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिली. यावेळी मालू म्हणाले की, सबस्टेशन उभे करण्याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संचालिका नीताताई केळकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच सब स्टेशन उभारणी करिता संस्थेचे संचालक रमेश आरवाडे हे गेली २ वर्षे मुंबई ऑफिस, सांगली ऑफिस येथे वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे सब स्टेशनचे काम मार्गी लागले. सदरचे नवीन सब स्टेशन झाल्यामुळे जे जुने उद्योजक आहेत त्यांना आपल्या उद्योगामध्ये वाढ करता येईल. आणि नवीन उद्योग चालू करणार आहेत त्यांनाही विज पुरवठा लवकर मिळेल.

तसेच शाळगावं एमआयडीसी मध्ये १४२०० स्क्वे.फुट मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महावितरणला सब स्टेशन उभे करण्यासाठी स्वत: इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून देणार आहे असे एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे यांनी सांगितले. सब स्टेशनची प्रलंबित कामे पूर्ण होत असून सदर कामाबाबत उद्योजकांच्याकडून महावितरण ऑफिस व एमआयडीसी ऑफिसचे कौतुक केले जात आहे. सदर सब स्टेशन झाल्यामुळे उद्योजकांना आपला उद्योगामध्ये वाढ करता येईल व मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल तसेच सांगलीच्या महसुलातही भर पडेल असे कृष्णा व्हॅली चेंबर अध्यक्ष सतीश मालू यांनी म्हटले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!