सांगली – नवीन वसाहत, गुरुद्वारा जवळ (दि. १४) रात्रीच्या १ च्या सुमारास अश्विनकुमार मुळके याचेवर ६ ते ७ इसमांकडून धारधार शस्त्राने वार करून तसेच स्टंप व फरशीने मारहाण करून त्याचा खुन करण्यात आला होता. या घटनेने सांगली परिसरात खळबळ माजली होती. या प्रकरणी सांगली पोलीस अधिक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकांनी युद्धपातळीवर तपास करून अवघ्या ८ तासांत सात संशयित आरोपीना जेरबंद केले. सदर गुन्हा करून आरोपी पसार झाले होते. त्यांची माहिती मिळवून या आरोपीना अटक करण्यात आले.
अजय उर्फ अजित पांडूरंग खोत वय २३ वर्ष रा. वडर गल्ली, सांगली, सुजित दादासो चंदनिशिवे वय-२९ रा. नवीन वसाहत, सांगली, कुनाल प्रशांत पवार वय-२२ रा. वडर कॉलनी, सांगली, विकी प्रशांत पवार वय-२३ रा. वडर कॉलनी, सांगली, गणेश रामाप्पा ऐवळे वय ३६ रा. गोकुळनगर, सांगली, अमोल गंगाप्पा कुंचीकोरवी वय-२८ रा. वडर गल्ली, सांगली, अर्जुन हणमंत पवार वय-२२ रा. वडर कॉलनी, सांगली यांना अटक केली आहे. आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील असुन त्यांचेवर खुन, खुनाचा प्रयत्न, मारामारी, जबरी चोरी अश्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.