सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तास आलेल्या जवानांसोबत धुलीवंदन साजरी

सांगली – लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने सांगली जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्याकरिता तसेच जिल्हा पोलीस दलाच्या मदती करीता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सी.आय.एस.एफ.) जवान बंदोबस्त कामी तैनात आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सी.आय.एस.एफ.) जवान हे लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने त्यांचे कुटूबांपासून दुरवर बंदोबस्तकामी तैनात असल्याने त्यांना धुलीवंदन हे सण कुटूबांसोबत साजरे करता येत नसल्याने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्हा पोलीस दलाचे कुटूंब प्रमुख या नात्याने त्यांचेसोबत पोलीस मुख्यालय, विश्रामबाग, सांगली येथे धुलीवंदन साजरी केले.

सदर कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक, रितु खोखर, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक अति. कार्यभार पोलीस उप अधीक्षक (गृह) अरविंद बोडके, राखीव पोलीस निरीक्षक सुर्यवंशी व जिल्हा पोलीस दलाकडील अधिकारी व अंमलदार यांनी या कार्यक्रमास उपस्थिती राहून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सी.आय.एस.एफ.) अधिकारी व कर्मचारी यांना धुलीवंदन सणाच्या शुभेच्छा दिल्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!