
कागल (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यातील शासकीय कार्यालय परिसरात वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालय कागल येथे आज वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीमती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वृक्षारोपण प्रसंगी रुग्णालयातील डॉ. धनंजय पाटील, डॉ. सुलभा पाटील, डॉ. प्रियांका किल्लेदार, सहाय्यक अधीक्षक राम सातवेकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. कोळी, औषध निर्माता श्री. चव्हाण व श्री. पाटील, श्रीमती चोथे, इन्चार्ज श्रीमती शेवाळे, श्री. बाळू पाटील, श्री. जॉन्सन, श्री. कोळी आणि श्री. आवळे आदी कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये विविध प्रकारची झाडे लावून परिसर हरित करण्याचा संदेश देण्यात आला.