कुपवाड – कृष्णा व्हॅली चेंबर, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीझ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २३/०८/२०२४ रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत जी.एस.टी., आय.टी.सी आणि ए.आय. या विषयावर कृष्णा व्हॅली चेंबरच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सेमिनार आयोजित केलेला आहे. सदर सेमिनार मध्ये जी.एस.टी. कायद्यामध्ये नवीन जे बदल झाले आहेत, ब्लॉक केलेले क्रेडिट्स, अपात्र क्रेडिट्स आणि क्रेडिट रिव्हर्सल्सवर विशिष्ट लक्ष केंद्रित करून GST अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट्सच्या तरतुदींची सखोल आणि विश्लेषणात्मक माहिती.
विविध आय.टी.सी. सामंजस्य आणि त्या दिशेने करावयाच्या कृती करण्याची व्यावहारिक पद्धत याबाबतची माहिती दिली जाणार आहे. तरी सदर सेमिनारसाठी उद्योजक तसेच कंपनीचे हेड यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सतीश मालू यांनी केले.