कुपवाड सूतगिरणीजवळ देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल विक्री करणाऱ्याला कुपवाड पोलिसांनी केले अटक, ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

कुपवाड – देशी बनावटीचे बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या युवकाला कुपवाड पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी संशयितांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, एक काडतूस असा ५० हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कराड तालुक्यातील जुळेवाडी येथील मनोज राजेंद्र खांडेकर (वय २५) याला कुपवाड औद्योगिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिपक भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाढवे, दऱ्याप्पा खोत, राजेंद्र नलवडे, जितेंद्र जाधव, शिवानंद गवाणे शेळकंदे, नामदेव कमलाकर, आप्पासो नरुटे, निलेश कोळेकर, संजय पाटील, सुरेखा कुंभार, अरुणा यादव, सुधीर गोरे, सचिन कनप, मधुकर सरगर विकास जाधव, दत्ता यमगर, रेखा सरगर, शकीरा मुल्ला आदी पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करणेत आले.

या पथकाला सूतगिरणीजवळील शारदा हॉस्पिटलजवळ एकजण पिस्तूलाची बेकायदा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करण्यासाठी सापळा लावला. आज (शनिवार) दुपारी चारच्या सुमारास संशयित बनावटी पिस्तुल विक्रीच्या उद्देशाने सूतगिरणी या ठिकाणी आला. यावेळी पथकाने झडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस व १०० रु. रोख रक्कम आढळून आले. या घटनेचा अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!