
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर, अंतर्गत तालुका कृषी विभाग कागल व पंचायत समिती कागल यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कृषीदिन व हेक्ट्री 125 मेट्रीक टन उत्पादकता वाढ अभियान शुभारंभ या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती कागल येथील सभागृहामध्ये करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम.गौरी मठपती, कृषि अधिकारी (जनरल), पंचायत समिती कागल यांनी केले.
या कार्यक्रमात *मा.नाम.श्री.प्रकाश आबीटकरसो, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर* यांनी सर्व शेतकऱ्यांना दुरभाष प्रणालीव्दारे मार्गदर्शन करुन हेक्ट री 125 मेट्रीक टन उत्पादकता वाढ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.
शेतकऱ्यांचा सत्कार व कृषिप्रबोधनपर व्याख्यान –
तालुक्यामध्ये कृषि विभाग, पंचायत समिती कागल व तालुका कृषि कार्यालय कागल यांचे संयुक्त विद्यमाने शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेणाऱ्या उपक्रमशील शेतकऱ्यांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला.
तालुका पातळी सन २०२४-२५ मधील भात पीक स्पर्धा विजेते शेतकरी –
१.श्री आनंदा रामा पाटील, रा. व्हन्नाळी – प्रथम क्रमांक- हेक्टरी उत्पादन 79 क्विंटल 74 किलो
२. श्रीम विमल मलगोंडा टेळे, रा. सुळकूड – व्दीतीय क्रमांक- हेक्टरी उत्पादन 65 क्विंटल 57 किलो.
३. श्री तानाजी सदाशिव पाटोळे रा.एकोंडी – तृतीय क्रमांक हेक्टरी उत्पादन 60 क्विंटल 22 किलो.
तालुका पातळी सन २०२४-२५ मधील सोयाबिन पीक स्पर्धा विजेते शेतकरी –
१.श्री गणेश जोतीराम मोरे, रा. हमीदवाडा – प्रथम क्रमांक – हेक्टरी उत्पादन 47 क्विंटल 05 किलो
२. श्री दिपक मारुती खवरे रा.माद्याळ – व्दीतीय क्रमांक – हेक्टरी उत्पादन 44 क्विंटल 35 किलो.
३. श्री नामदेव तुकाराम पोवार रा. व्हन्नाळी – तृतीय क्रमांक- हेक्टरी उत्पादन 43 क्विंटल 95 किलो.
तालुका पातळी सन २०२३-२४ मधील सोयाबिन पीक स्पर्धा विजेते शेतकरी –
१.श्री बाबुराव दादु पाटील , रा. म्हाकवे – प्रथम क्रमांक – हेक्टरी उत्पादन 56 क्विंटल 84 किलो
२. श्री शिवराम भाऊ जाधव रा. व्हन्नाळी – व्दीतीय क्रमांक – हेक्टरी उत्पादन 46 क्विंटल 60 किलो.
३. श्री बाळकृष्णा दादु आंबीलढोके रा. नंद्याळ – तृतीय क्रमांक- हेक्टरी उत्पादन 44 क्विंटल 75किलो
या शेतकऱ्यांचा सत्कार झाल्यानंतर मा.श्री अभयकुमार बागडे, प्राध्यापक, कृषि किटकशास्त्र , कृषि महाविद्यालय कोल्हापूर यांचेकडून खरीप हंगामातील पीकावरील किड व रोग व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान झाले. भात, ऊस, भाजीपाला पिके यावरील किड व रोगांची माहिती शेतकऱ्यांना दिली.
यावेळी पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी यानी शेतकऱ्यांनी शेतमालावर स्वता प्रक्रिया व पॅकेजींग करुन विक्री व्यवस्था उभारल्यास जास्त नफा कमवता येतो तसेच आधुनिक आर्टीफीशीयल इंटेलीजन्स च्या तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादन खर्च कमी करावा असे आवाहन केले.
तसेच तालुका कृषि अधिकारी श्री शेखर थोरात यांनी कृषि दिनाचे महत्व व कृषि विभागाकडील राबवण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमावेळी कृषिभूषण पुरस्कार विजेते शेतकरी श्री आप्पासाहेब पाटील व श्री सुरेश मगदुम तसेच शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी श्री धोंडीराम कतगर , श्री कलगोंडा टेळे, व श्री केरबा हरी माने हे हजर होते. तसेच पंचायत समितीचे सहा.गटविकास अधिकारी, प्रमोदकुमार तारळकर, कृषि अधिकारी (वि.घ.यो) श्री.आप्पासाहेब माळी, तालुका कृषि कार्यालय व पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.