
कोल्हापूर : शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या तळागाळातील शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवली आहे. परंतु, शिवसेनाप्रमुखांच्या विचारालाच फाटा दिला गेला त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची सूत्रे हाती घेत शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आंनद दिघे यांच्या विचारानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत असून, टीकेला उत्तर न देता महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून महाराष्ट्र राज्याच्या विकासाची दूरदृष्टी ठेवून शिवसेना काम करत आहे. आगामी काळात महाराष्ट्र राज्याची उन्नती आणि सर्वांगीण विकास हेच धोरण शिवसेनेचं असून, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा खरा वारसा जपणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील दि.२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची आढावा बैठक पार पडली.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागलं पाहिजे. ज्याला निवडणूक लढवायची त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. मतदारांपर्यंत पोहचून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे असणारे काम महायुतीचे कामं मांडा. लाडक्या बहिणी मुळे महिलांमध्ये शिवसेनेबद्दल भावा- बहिणेचे नाते निर्माण झाले आहे यामाध्यमातून महिला मतदारांशी संपर्क वाढवा. महिलासाठी भागा-भागात कार्यक्रम घ्या. नागरिकांचे असणारे प्रश्न सोडविण्यासाठी पदाचा वापर करून अधिकाऱ्यांकडून काम करून घ्या. शासन स्तरावर आमदार, खासदार, मंत्री महोदयांची लोकहिताची कामे सुरूच आहेत. जिल्ह्यातील प्रमुख प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी एकसंघ होवून काम करत आहे. आता स्थानिक हेवे-दावे सोडून एकसंघ होवून धनुष्यबाण हाच उमेदवार समजून कामाला लागा अशा सूचना दिल्या.
ते पुढे म्हणाले कि, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेला दसरा मेळाव्यास उपस्थित राहण्याचे हे माझे ४० वे वर्ष.. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यात शिवसैनिक उपस्थित असायचे. हेच विचार आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या रूपाने शिवसैनिकांना मिळत आहेत. दसरा मेळावा हा शिवसेनेचा विजयोत्सव असून, आझाद मैदानावर होणाऱ्या मेळाव्यास कोल्हापुरातून सर्वाधिक शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय ठरणार आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे हजारो शिवसैनिक मेळाव्याला उपस्थित राहतील, असे सांगितले.
यावेळी बोलताना शिवसेना उपनेत्या माजी आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी, प्रत्येकाने आपणच निवडणूक लढतोय ही भावना ठेवून कामं केलं पाहिजे, उपमुख्यमंत्री शिंदे आणि आमदार क्षीरसागर कायम पाठीशी आहेत, याचं भान ठेवून काम पाहिजे. तिकीटासाठी शिवसेनेकडे जास्त ओघ आहे यावरून शिवसेनेची लोकप्रियता दिसून येते त्यामुळे नाराज न होता ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीशी ठाम उभे राहून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यास सज्ज व्हा, अशा सूचना केल्या.
यावेळी बोलताना माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी, आज इच्छुक आणि भावी नगरसेवक बरेच आहेत. क्षीरसागर साहेब जो निधी आणत आहेत त्याची माहिती लोकांपर्यंत आपण पोचवावी. सगळ्या गोष्टी विकत घेण्याची भावना असणारे विरोधक दक्षिण विधानसभा मतदार संघात आहेत, म्हणून कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या शिवसेना पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगितले.
या बैठकीस महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी पवार, शहरप्रमुख अमरजा पाटील, पूजा भोर, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, रमेश पुरेकर, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, माजी नगरसेवक राजू हुंबे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक अमोल माने, माजी नगरसेवक अजित मोरे, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, सामाजिक कार्यकर्ते अजय इंगवले, नेपोलियन सोनुले, आश्पाक आजरेकर, सुनील जाधव, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, दुर्गेश लिंग्रस, निलेश हंकारे, प्रभू गायकवाड, अंकुश निपाणीकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
