आरक्षणाची घोषणा, नगरपरिषदा व नगरपालिकांसाठी महिला आरक्षण जाहीर, शिरोळ, कागल, मुरगूड, कुरुंदवाडमध्ये कोणाला संधी?

Share News

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली असून, या प्रक्रियेत महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी राखीव ठेवल्या गेल्या आहेत. एकूण 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींपैकी 33 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण निश्चित झाले असून, यामध्ये देऊळगावराजा, मोहोळ, तेल्हारा, ओझर, वानाडोंगरी, भुसावळ, घुग्गूस, चिमूर, शिर्डी, सावदा, मैनदर्गी, दिगडोहदेवी, दिग्रस, अकलूज, बीड आणि शिरोळ यांचा समावेश आहे.

तसेच 64 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे. यामध्ये इगतपुरी, भोकरदन, जुन्नर, दौंड, माजलगाव, कर्जत, रोहा, भगूर, विटा, बल्हारपूर, धाराशिव, उमरेड, कुळगाव बदलापूर, हिंगोली, फुलगाव, मुरुड जंजीरा, शिरूर, काटोल, मूल, मालवण, देसाईगंज, हिवरखेड, अकोट, मोर्शी, नेर-नवाबपूर, औसा, देगलूर, चोपडा, सटाणा, दोंडाईचा वरवडे, बाळापूर, कुरडुवादी, धामणगावरेल्वे आणि वरोरा नगरपरिषदा यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी 68 नगरपरिषदा राखीव करण्यात आल्या आहेत. यामध्ये परळी वैजनाथ, मुखेड, अंबरनाथ, अचलपूर, मुदखेड, पवनी, कन्नड, मलकापूर-कोल्हापूर, मोवाड, पंढरपूर, खामगाव, गंगाखेड, धरणगाव, बार्शी, अंबड, गेवराई, म्हसवड, गडचिरोली, भंडारा, उरण, बुलढाणा, पैठण, कारंजा, नांदूरा, सावनेर, मंगळवेढा, कलमनूरी, आर्वी, किनवट, कागल, संगमनेर, मुरगुड, साकोली, कुरुंदवाड, पूर्णा, कळंब, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, भूम, रत्नागिरी, रहिमतपूर, खेड, करमाळा, वसमत, हिंगणघाट, रावेर, जामनेर, पलुस, यावल, सावंतवाडी, जव्हार, तासगाव, राजापूर, सिंदीरेल्वे, जामखेड, चाकण, शेवगाव, लोणार, हदगाव, पन्हाळा, धर्माबाद, उमरखेड, मानवत, पाचोरा, पेण, फैजपूर, उदगीर आणि अलिबाग या नगरपरिषदा समाविष्ट आहेत.

सरकारच्या या आरक्षण निर्णयामुळे स्थानिक राजकारणात महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असून, अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नवीन नेतृत्व उदयास येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलाराज असणार आहे. गडहिंग्लज नगर परिषदेसाठी अनुसूचित जाती पुरुष आरक्षण जाहीर झालं आहे. पन्हाळ्यामध्ये महिला ओपन, कागलमध्ये महिला ओपन, मुरगुडमध्ये महिला ओपन, कुरुंदवाडमध्ये महिला ओपन आणि शिरोळमध्ये अनुसूचित जाती महिला असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आरक्षण निश्चित झाल्याने आता उमेदवार निश्चितीसाठी सुद्धा वेग येणार आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!