
कागल : विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळी विद्यमान व पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्तीचे आश्वासन दिले होते पण जवळपास एक वर्ष उलटूनही याविषयावर कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गीक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, उत्पादन खर्चातील वाढ महागडी खते, औषधे यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. पीकांचे भाव हमी भावापेक्षा कमी मिळत असून उत्पादन खर्च वसूल करणे देखील कठीण झाले आहे. शेतकरी व ग्रामीण भागाचे उपजीविकेचे प्रमुख साधन शेतीतील उत्पन्नाला हमीभाव, योग्य बाजार नसल्याने बहुतांश शेतकरी बैंक व सावकाराकडील कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत, अनेकांना थकबाकीमुळे नोटीसा, जप्ती कार्यवाही, काहीकडून तर आत्महत्येचे टोकाचे निर्णय घेतले जात आहे. दिवसेंदिवस त्याचे आकडे वाढत आहे.

या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हीच तातडीची व परिणामकारक उपाययोजना आहे. ही कर्जमुक्ती सर्व प्रकारच्या कर्जावर, यामध्ये थकबाकीदार, चालू बाकीदार यांच्यासह अल्प मुदतीचे पीक कर्ज, मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पॉलीहाऊस, दुध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले तसेच सावकारी कर्ज यात समाविष्ट करण्यात यावी.
प्रमुख मागणी
- अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये 50 हजार इतकी थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी.
- नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातुन कर्जमुक्त करावे.
- पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
- अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना, जुने निकष न लावता, योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा.
या मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कागल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
यावेळी
शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे
कागल तालुका प्रमुख
जयसिंग टिकले.
कागल तालुका प्रमुख
शिवगोंडा पाटील.
कागल तालुका सोशल मीडिया प्रमुख अजित बोडके.
कागल शहर प्रमुख.अजित मोडेकर.
कागल तालुका महीला संघटीका कांचन माने.
कागल वाहतुक सोना माळू करिकटे्.
वैभव मोडेकर.
विभाग प्रमुख वैभव मोडेकर.
अमृत पाटणकर.
राजु साबळे.
अमर संकपाळ.
वाहतूक सेनेचे नितिन डावरे.
व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.