
कागल : ग्रामीण भागातील मुला मुलींचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत शाळा यांच्यामध्ये मुलांच्या संख्येची वाढ व्हावी व जिल्हा परिषद शाळेत विविध कलागुणांना संधी मिळावी या उद्देशाने पगारिया वेल्फेअर फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने विद्या मंदिर मळगे खुर्द तालुका कागल या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते तिसरी या वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील सर उपस्थित होते पगारिया वेल्फेअर फाउंडेशनचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कांबळे आणूरकर, धनाजी जिरगे बाणगे कर सामाजिक कार्यकर्ते अनिल गुंडू कांबळे आनूरकर महाराष्ट्र शासन समाजभूषण आयु सिद्धार्थ कृष्णा कांबळे आणूरकर व शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार पाटील सर यांनी केले
