
कोल्हापूर : शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष मोहिमेत २८९ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. मलबार हॉटेल चौक, खानविलकर पेट्रोल पंप, गोखले कॉलेज चौक, ताराराणी सिंग्नल चौक, विवेकानंद कॉलेज परिसर व सायबर चौक या प्रमुख ठिकाणी सकाळी ९ ते ११ वाजताच्या कालावधीत पोलीस अधिकारी व अंमलदारांना नेमून ही मोहीम राबवण्यात आली होती.

उल्लंघन प्रकारांमध्ये मोबाईलचा वापर, वाहनाचा इन्शुरन्स नसणे, विनापरवाना बदल, कर्कश हॉर्न, रहदारीस अडथळा, जादा प्रवासी बसविणे, लायसन्स जवळ न बाळगणे, अस्पष्ट नंबर प्लेट इत्यादी समाविष्ट आहेत. या सर्व उल्लंघनांवरून २ लाख ५९ हजार २०० रुपये दंड आकारण्यात आला.
ही कारवाई कोल्हापूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा नागरिकांना आवाहन करते की, वाहन चालवताना नियमांचे पालन करावे, अन्यथा पुढील काळातही यासारखी व्यापक कारवाई सुरू राहणार आहे.