
कुपवाड : सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून कुपवाड एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाटगे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी ‘विकसित भारत’ या विषयावर गीत व पदनाट्य सादर करून कौशल्यविकास आणि देशसेवेचा संदेश दिला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार चेअरमन डॉ. यशवंत तोरो यांनी शाल, श्रीफळ आणि रोप देऊन केला. या वेळी सुरज फाउंडेशनच्या संचालिका संगीता पागनीस, प्राचार्य अधिकराव पवार, उपप्राचार्य प्रशांत चव्हाण, प्रशासकीय अधिकारी रघुनाथ सातपुते, स्पोर्ट्स इन्चार्ज विनायक जोशी, आयटी इन्चार्ज राजेंद्र पाचोरे, अकाउंट विभाग प्रमुख श्रीशैल मोटगी व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांनी दीपप्रज्वलन करून उत्सवाचा समारोप केला.