महावितरणच्या कंत्राटी कामगारांना सुरक्षा कवचचे वाटप

Share News

जमीर मुल्ला यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

कागल (ता.कागल) : येथे कोल्हापूर विद्युत अप्रेंटिस स्वयंरोजगार संस्थेच्या माध्यमातून कागल व हुपरी सबडिव्हिजन मध्ये कार्यरत बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना सुरक्षा कवचचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी महावितरण ग्रामीण विभाग २ चे कर्तव्यदक्ष अधिकारी दता भणगे होते.

कोल्हापूर विद्युत अप्रेंटिस स्वयंरोजगार संस्था जवाहर नगर कोल्हापूर या संस्थेकडून महावितरण कंपनीस मनुष्यबळ पुरवले जाते. कंत्राटी कामगार हा जबाबदारीने आणि जोखमीचे काम करत आहे. त्यांना सुरक्षा साधनांची गरज ओळखून कागल हुपरी या दोन्ही उपविभागकडील शेकडो कामगारांना सुरक्षा साधने वाटप करण्यात आली .

कंत्राटी विद्युत कामगारांना हेल्मेट,पक्कड स्टेस्टर,स्क्रूड्रायवर ,हॅडग्लोज, इत्यादी साधनांचे वाटप महावितरण कोल्हापूर ग्रामीण विभाग २ चे कर्तव्यदक्ष अधिकारी दता भणगे, कोल्हापूर विद्युत अप्रेंटिस स्वयंरोजगार संस्थेचे चेअरमन जमिर मुल्ला,याच्या हस्ते हे साहित्य वाटप केले.

यावेळी कार्यकारी अभियंता म्हणाले की,कंपनी मध्ये कामाची विभागणी झाली आहे. कंपनीसाठी विद्युत बिलाची वसुली महत्वपूर्ण आहे. मेंटनन्स असो की वसुली या कडे कर्मचाऱ्यांनी निरपेक्ष निःस्वार्थ वृत्तीने काम करावे.

यावेळी कागल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अमितकुमार आळवेकर, हुपरी सबडिव्हिजनचे उपकार्यकारी अभियंता संस्थेचे सचिव आरिफ तांबोळी, संचालक रमेश कांबळे, व्यवस्थापक मोसिन तांबोळी,एलडीसी शौकत मुल्लानी, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघटनेचे ग्रामीण विभाग २ चे अध्यक्ष किरण माळी ,कागल सबडिव्हिजन अध्यक्ष राजेंद्र ढाले,हुपरी सबडिव्हिजन अध्यक्ष अविनाश कांबळेसह, पदाधिकारी व शेकडो विज कंत्राटी कामगार बाधव उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव आरिफ तांबोळी यांनी तर आभार कागल सब डिव्हिजन अध्यक्ष राजेंद्र ढाले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!