
तळदंगे ( ता.हातकणंगले) : बेघर वसाहतीतून 23 वर्षीय तुषार वसिम मंडल हा युवक घरातून बाहेर पडून बेपत्ता झाल्याची घटना 8 नोव्हेंबर रोजी घडली. सकाळी सुमारे नऊ वाजता कामावर जातो, असे सांगून तो घरातून निघाला मात्र पुन्हा परतला नाही, अशी माहिती त्याचे वडील वसिम मंडल यांनी हुपरी पोलीस ठाण्यात दिली. तुषारच्या बेपत्ता झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तुषार मंडल (वय 23) हा सेंट्रिंग कामगार आहे. वडीलांच्या तक्रारीवरून मिसिंग रजिस्टरमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील अधिक तपास हुपरी पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पोलीस करीत आहेत. तुषारचा शोध सुरू आहे.