
गोकुळ शिरगाव (कोल्हापूर) : पंचतारांकित औद्योगिक परिसरातील क्रोना स्टील डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४८ हजार ४०० रुपयांच्या इलेक्ट्रिक केबल्सची चोरी केल्याचा गुन्हा गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. २७ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास या परिसरातील फर्नेस एरियामधून विविध प्रकारच्या अॅल्युमिनियम, कॉपर व वेल्डिंग केबलचे मोठे बंडल अज्ञात चोरट्यांनी पळवले. फिर्यादी श्रीनिवास विष्णुगौडा पाटील यांच्या तक्रारीनुसार, कंपनीत ठेवलेले साहित्यांची चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस करीत आहेत.