राजे शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार २०२६ साठी पत्रकार राजेंद्र ढाले यांची निवड.

Share News

मलकापूर (जि. बुलढाणा) : माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने दिला जाणारा राजे शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार-२०२६ साठी आदर्श पत्रकार म्हणून कोल्हापूरचे सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते पत्रकार मा. राजेंद्र ढाले यांची निवड करण्यात आली आहे.

माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर जिल्हा बुलढाना यांच्यातर्फे दरवर्षी देण्यात येणारा हा पुरस्कार तालुका शिक्षक संघ पतसंस्था हॉल ४० बिघा मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता एका भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि पुस्तके असे आहे.

फाउंडेशनच्या निवड समितीने पत्रकार राजेंद्र ढाले यांच्या समाजसेवेतील योगदानाची दखल घेत एकमताने ही निवड केली. विविध सामाजिक चळवळी, सांस्कृतिक उपक्रम, आणि लोकसहभागातून जनजागृती यामध्ये त्यांचे योगदान लक्षणीय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!