कागल मधील होणारा राष्ट्रीय धम्म मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती

Share News

कागल : येत्या काही दिवसांमध्ये कागल शहरातील ऐतिहासिक गैबी चौक येथे पहिला राष्ट्रीय बौद्ध धम्म मेळावा महाराष्ट्र कर्नाटक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील गहीनाथ नगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय या ठिकाणी आढावा बैठक संयोजन कमिटी व नागरिकांच्या मध्ये संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दलित मित्र बळवंत माने हे होते तर प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश गाडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची होती.
स्वागत व प्रास्ताविक करताना रमेश रत्नाकर यांनी कागल शहरांमध्ये होणाऱ्या पहिल्या बौद्ध धम्म मेळाव्याची संकल्पना व माहिती सांगितली. यावेळी माजी नगरसेवक विवेक लोटे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा दिल्या.आपले मनोगत व्यक्त करताना नियोजन कमिटीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले कागल मध्ये होणारा पहिला राष्ट्रीय बौद्ध धम्म मेळावा हा राजकारण विरहित आहे . हा कार्यक्रम झोपलेल्या समाजाला जागा करणारा असून हा कार्यक्रम सर्वसमावेशक होणे गरजेचे आहे . तसेच समाज एक संघ दाखवण्याची गरज आहे. सदर होणारा कार्यक्रम हा आपलाच आहे असं समजून समाजातील महिला व पुरुष वर्गाने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाश गाडेकर यांनी केले ‌

  शेवटी बैठकीच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना बळवंत माने म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील जनतेसाठी केलेल्या कामाची परतफेड करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाला समाज म्हणून एकत्र येऊन या कार्यक्रमातून बौद्ध धम्माचे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पाहिजे असे मनोगत बळवंत माने यांनी केले. 
   यावेळी योगेश दाभाडे, सागर शिंदे, भिकाजी कांबळे, रमेश कांबळे , नगरसेवक उमेश सावंत यांनी आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी भगवान कांबळे, उत्तम कांबळे ,चंदनशिवे सर ,संजय फरागडे ,बबलू कांबळे ,तानाजी भोसले, आशिष कांबळे ,डॉ मोहन कांबळे, ॲड रुपेश वाघमारे यांच्या सह नियोजन समितीचे सर्व सदस्य व कागल तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय ढोबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विवेक लोटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!