
कागल : कागल मधील निपाणी वेस येथे उभारण्यात आलेल्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला लाईट व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आज छ.शाहू महाराज पत्रकार संघाच्यावतीने कागलचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना निवेदन देण्यात आले..
छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यावर रात्रीच्या वेळी असणारी लाईट व्यवस्था अश्या प्रकारे आहे की , यामध्ये महाराजांच्या स्मारकावरील चेहऱ्याचा संपूर्ण भाग अंधारमय स्थितीत दिसतो यामुळे महाराजांचे स्मारक दिसते पण चेहरा दिसत नाही , यासाठी आज शाहू महाराज पत्रकार संघाच्या वतीने मुख्याधिकारी याना निवेदन देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले

मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी सुद्धा याची माहिती घेऊन तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले यावेळी आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे हे देखील उपस्थित होते..
छत्रपती संभाजी महाराज पुतळा सुशोभीकरण, लाईट व्यवस्था , पार्किंग यावर सविस्तर चर्चा करण्यात आली…
यावेळी छ.शाहू महाराज पत्रकार संघाचे सचिव पत्रकार राजेंद्र ढाले , उपाध्यक्ष पत्रकार प्रशांत दळवी , सदस्य पत्रकार एम.डी.कांबळे , पत्रकार स्वप्नील गोरंबेकर , पत्रकार अमोल धोतरे , पत्रकार नामदेव गुरव यांच्या शिष्टमंडळाने ही भेट घेतली.