
जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी-रत्नागिरी) तालुका-पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथे दिनांक ३० मार्च २०२६ ते दिनांक ०१ एप्रिल २०२६ रोजी पर्यंत श्री. जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा साजरी होत आहे. सदर यात्रा काळात महाराष्ट्र राज्यातून व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात नाविक खाजगी व सार्वजनिक मोटार वाहनांनी श्री. जोतिबा मंदीर डोंगरावर येतात. भावीकांचे मोटार वाहनांची प्रचंड संख्या व जोतिवा डोंगर येथील पार्किंगच्या जागेची उपलब्धता आणि भौगोलिक परिस्थिती पाहता रहदारीच्या प्रमुख मार्गावर मोटार वाहनाचे पार्किंग होऊन वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाविकांची सुरक्षा व मोटार वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. या करीता यात्रा काळात जोतीवा डोंगर घाटामध्ये खालील प्रमाणे एकेरी वाहतूक, मोटार वाहनांना प्रवेश बंद / मार्ग वळविणे, वाहनांचे पार्किंग व नो पार्किंग / हॉल्टींगचे नियोजना बाबत मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी खालील प्रमाणे निर्देश दिलेले आहेत, तरी मोटार वाहनचालक व भाविकांनी वाहतुक नियोजनास सहकार्य करावे.
- वाहतुकीसाठी एकेरी वाहतुक व प्रवेश बंद करण्यात येणारे मार्ग-(यात्राविषयक अत्यावश्यक सेवेतील व शासकीय वाहनांना वगळून)
अ) जोतिबा डोंगरावर जाण्याकरिता रहदारी नियमन :-
१. दिनांक ३०.०३.२०२६ रोजीचे रात्रौ ८.०० वा. पासुन मालाने भरलेले ट्रक, अवजड वाहने, तीनचाकी प्रवासी व माल वाहतूक रिक्षा तसेच दोन ट्रेलर असलेले ट्रॅक्टर यांना जोतीबा डोंगरावर जाणेस केलीं, कुशिरे, वाघबीळ, गिरोली या नाकाबंदी ठिकाणाहून पुढे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या मालाची वाहतूक त्यापूर्वी सोयीनुसार करावी.
२. दिनांक ०१/०४/२०२६ रोजी मुख्य जोतीबा यात्रा असल्याने सदर दिवशी सकाळी ०५.०० वा. पासून सर्व दुचाकी वाहनांना जोतिचा डोंगरावर दानेवाडी क्रॉसिंग आणि जुने आंब्याचे झाड येवून वर तसेच गिरोली फाटा या ठिकाणावरुन प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे. चारचाकी व इतर वाहनांना जोतीबा डोंगराचर पार्किंग करीता जागा अपुरी पडल्यास परिस्थिती अनुरूप सर्व मोटार वाहने डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पार्कींग ठिकाणी नवीन अंब्याचे झाड ते जुने आब्यांचे झाड आणि श्रवणी हॉटेल/गिरोली फाटा ते दानेवाडी फाटा परिसर या ठिकाणी केलेल्या पार्किंगच्या ठिकाणी आपली वाहने पार्क करावीत आणि तेथून श्री. जोतीबा डोंगरावर उपलब्धते नुसार मोफत एस.टी. किंवा के.एम.टी. या सार्वजनिक्त बसेसचा उपयोग करावा. भाविकांनी आपली वाहने नवीन आंब्याचे झाड ते जुने आंब्याचे झाड आणि श्रवणी हॉटेल/गिरोली फाटा ते वानेवाडी फाटा या भागात डोंगराच्या पायथ्याशी नियोजीत ठिकाणी पार्क करुन यात्रा सुरळीत व सुरिक्षत पार पाडण्यासाठी व भाविकांना होणा-या अडचणी व त्रास टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे,
३. केर्ली किंवा कुशिरे गावावरुन येणा-या सर्व मोटार वाहनांनी (यात्राविषयक अत्यावश्यक सेवेतील व शासकीय वाहनांना वगळून) सामाजीक वनीकरण फाटा येथून गावमुख जुने आंब्याचे झाड मार्गे जोतीबा डोंगरावर रवाना व्हावे आणि पार्किंगच्या नियोजीत जागेमध्ये आपली वाहने पार्क करावीत..
४. अशाच प्रकारे गिरोली किंवा यमाई कडून येणा-या सर्व मोटार वाहनांनी (यात्राविषयक अत्यावश्यक सेवेतील व शासकीय वाहनांना वगळून) गिरोली फाटा (श्रावणी हॉटेल) येथून सरळ जोतीबा डोंगरावर रवाना व्हावे आणि पार्किंगच्या नियोजीत जागेमध्ये आपली वाहने पार्क करावीत.
५. श्री. जोतिबा डोंगर ते जुने आंब्याचे झाड या दरम्यानची वाहतूक दोन्ही मार्गाने चालू राहील.
ब. जोतिबा डोंगर उतरण्यासाठी रहदारी नियमन :-
१. श्री. जोतिबा मंदीर येथून दर्शन घेवून परत जाणाऱ्या भावीकांनी (ग्रामपंचायत, मेन पार्किंग व यमाई पार्किंग येथे पार्क असलेल्या वाहन चालकांनी) गिरोली मार्गे, कोल्हापूर व इतर ठिकाणी मार्गस्त व्हावे.) श्री. जोतिबा मंदीर येथुन देव वर्शन घेवून परत जाणाऱ्या भावीकांनी (ट्रक ट्रॅक्टर सेंट्रल प्लाझा येथील पार्किंग ते नवीन एस टी स्टैंड येथे पार्क असलेल्या वाहनांनी जुने आंब्याचे झाड ते गायमुख ते केलें मार्गे किंवा दानेवाडी, वाघबीळ मार्गे कोल्हापूर व इतर ठिकाणी मार्गस्त व्हावे.
३) दिनांक ०१/०४/२०२६ रोजी सायंकाळी अंदाजे ५ वा. चे सुमारास यात्रा संपलेनंतर मोटार वाहने एकाचवेळी मोठया प्रमाणात जोतिबा डोंगरावरुन घाट रस्त्याने खाली येणार असल्याने सदर दिवशी दुपारी ४ वा. पासून यात्रा उत्तरेपर्यंत केलीं फाटा व गिरोली गावचा टी पॉईंट रस्ता या ठिकाणावरुन तसेच इतर कोणत्याही मार्गावरुन जोतिबा डोंगरावर जाणेस एस.टी. बस सह सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. पालखी सोहळा कार्यक्रमासाठी येणा-या भाविकांनी दुपारी ४ वा. चे पुवीं जोतीबा डोंगरावर पोहचण्याची दक्षता घ्यावी.
४) यात्रा संपल्यानंतर घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व वाहने (दुचाकी खेरीज करुन जुने आंव्याचे झाड येथून गायमुख मार्गे केलींकडे रवाना होतील,
५. श्री. जोतिबा मंदीर या ठिकाणी यानेकरीता आलेल्या भावीकांनी यात्रा उतरताना गिरोली फाटा येथून जाणारी सर्व वाहने सादळे – मादळे मार्गे तसेच यमाई पायरी पासून वाहने दानेवाडी फाटा मार्गे (दानेवाडी क्रॉसिंगकडे न जाता ) वाघबीळ मार्गे रवाना होतील.
६) केलीं, वाघबिळ, माले फाटा, दानेवाडी क्रॉसिंग, गिरोली फाटा या मार्गावरून पुढे जोतिबा डोंगरावर जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना (यात्राविषयक अत्यावश्यक सेवेतील व शासकीय वाहनांना वगळून) मनाई करण्यात येत आहे.
७) केलीं ते जुने आंब्याचे झाड ते दानेवाडी क्रॉसिंग ते MTDC रेस्ट हाऊस ने सेंट्रल प्लाझा ते यमाई टोल नाका ते गिरोली फाटा ते दानेवाडी रस्त्यावरील निलगिरी बाग या दरम्यानचे मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्यांच्या दोन्ही बाजुस थांबणेस व वाहन पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.
८) दिनांक ३०/०३/२०२६ चे रात्री ८.०० वा. ते दिनांक ०१/०४/२०२६ चे रात्री ११.०० वा. पर्यंत कोल्हापूर ते बोरपाडळे फाटा या मार्गावरील अवजड वाहने, एक अँक्सल पेक्षा जादा अँक्सल वाहने व मालवाहतूक करणारे ट्रॅक्टर्स इ. वाहनांना बोरपाडळे या ठिकाणी प्रवेश बंद करणेत येत आहे. रत्नागिरी दिशेकडून येणा-या / जाणा-या वाहनांनी बोरपाडळे फाटा- कोडोली वाठार मार्गे राष्ट्रीय महामार्ग या मार्गाचा ये-जा करणेसाठी वापर करावा,
९) श्री. जोतिबा मंदीर येथील यात्रा संपलेनंतर मातोश्री लॉज ते दानेवाडी फाटा एकेरी वाहतूक सुरु राहील. दानेवाडी फाटयापासून मातोश्री लॉजकडे जाणा-या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. मातोश्री लॉज यमाई पायरी क्र. १ व २ निलगिरी बाग लादे मळा या ठिकाणी पार्किंग करण्यात आलेल्या वाहन चालकांनी दोनवाडी फाटा मार्गे माले काटा/वाघबीळ मार्गे सोयीनुसार मार्गस्थ होणेचे आहे.
क) जोतिबा यात्रेनिमित्त मोटार वाहन पार्किंग व्यवस्था :-
महत्वाची पार्किंग
१. मेन पार्किग – मंदीराकडे जाणारे बुमजवळ-सासन काठी राखीव
२. सेंट्रल प्लाझा – ट्रक, ट्रॅव्हल्स, ट्रॅक्टर व इतर मोठी वाहने
ड) गिरोली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनासाठी पार्किंग –
चारचाकी वाहनांसाठी पार्किंग
१. चमाई वळणावर
२. यमाई डावी बाजू
३. यमाई उजवी बाजू
४. बुने कॉर्नर
५. श्रावणी हॉटेलच्या पाठीमागे
६. श्रावणी हॉटेल के. एम.टी. बस स्टॉप च्या बाजुला
७. तीव्र वळणाच्या बोर्डाजवळ पडकी इमारत
८. यमाई पायरी जवळ क्र. १
९. यमाई पायरी जवळ पार्किंग क्र. २
१०. बमाई पायरी समोर
११. निलगिरी बाग
१२. निलगिरी बाग समोर क्र. १ बुने कॉर्नर
१३. निलगिरी बाग समोर क्र. २
१४. लादे मळा
१५. मातोश्री लॉजिंग डावी बाजू
१६. दोनवाडी फाटा
१७.बुणे फार्म हाऊस पाठीमागे
दुचाकी वाहनांसाठी पार्किंग
१. यमाई मंदीराच्या पाठीमागे
२. चुने फार्म हाऊस
३. श्रावणी हॉटेल समोर रो हाऊस च्या पाठीमागे चढावर
ई) केर्ली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनासाठी पार्किंग:-
चारचाकी वाहनांसाठी पार्किंग
१. जुने एस.टी. स्टैंड समोर MTDC वळणावर
२. पिराचा कड़ा
३ .तोरणाई कडा
४. नवीन एस.टी. स्टैंड च्या पाठीमागे
५. जुने आंब्याचे झाड डावी बाजु क्र. १
६. जुने आंब्याचे झाड डावी बाजु क्र. २
७. नवीन आंब्याचे झाड फार्म हाऊस डावी बाजू
८. गायमुख इनाम पार्किंग
९. शेवताई
दुचाकी वाहनांसाठी पार्किंग
१. MTDC समोर
२. टोल नाक्याच्या बाजुला तळ्याजवळ
३. नवीन आंब्याचे झाड फार्म हाऊस उजवी बाजू
वाडी रत्नागिरी श्री. जोतिबा मंदीर या ठिकाणी यात्रेकरीता येणा-या भाविकांचेसाठी वरील प्रमाणे वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले असून भाविकांनी नमुद पार्किंगच्या ठिकाणी आपली वाहने पार्क करावीत इतर कोणत्याही ठिकाणी / रहदारीच्या रस्त्यावर वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात येत आहे.
प्रथम डोंगरावरील पार्कींग भरले नंतर डोंगर पायथ्याची पार्कीग ठिकाणे भरली जातील. डोंगर पायथ्याशी वाहने पार्क करुन डोंगरावर जाणेसाठी मोफत बसची सोय केलेली आहे.
वरील प्रमाणे वाहतूकीचे एकेरी मार्ग व प्रवेश बंद हे नियमन दिनांक ३० मार्च २०२६ रोजी रात्री ८ वा.पासून दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११ वाजे पर्यंत करण्यात येत आहे. तसेच वाहनांची गर्दी व घाटमार्गातील परिस्थिती आणि डोंगरावरील पार्किंगची परिस्थिती पाहून वाहतूक चालू किंवा बंद करण्याचा अधिकार यात्रा बंदोबस्त प्रभारी अधिकारी यांना देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वाहतूक तसेच पार्किंग मध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील.
वरील सर्व वाहतूक नियमनांचे पालन करून भाविकांनी पोलिसांना सहकार्य करावे.असे आवाहन कोल्हापुर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले.