भारतीय बौद्ध महासभेची कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक उत्साहात संपन्न

Share News

कोल्हापूर : भारतीय बौद्ध महासभा (The Buddhist Society of India) कोल्हापूर जिल्हा नव्याने नियुक्त कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची पहिली महत्त्वपूर्ण बैठक रविवारी (दि. १५ फेब्रुवारी) दुपारी १ वाजता मिस क्लार्क बोर्डिंग, बिंदू चौक, कोल्हापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सातापा कांबळे बस्तवडेकर होते. या बैठकीस राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य महेश धम्मरक्षित सर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संघटन बळकटीकरण, बौद्ध धम्म प्रचार-प्रसार, सामाजिक एकजूट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार यावर विशेष भर दिला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि गावपातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत नव्या कार्यकारिणीच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी धम्मकार्यक्रम, संघटन विस्तार, सदस्य नोंदणी मोहीम, युवक व महिला सहभाग वाढविणे, तसेच सामाजिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याबाबत निर्णय घेण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून जिल्ह्यात बौद्ध चळवळ अधिक प्रभावी करण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी अशोक कांबळे, सात्तापा कांबळे,आर बी कोसंबी, आप्पासो कांबळे,अशोक कांबळे, पंडीत कांबळे, अनिल कांबळे, नागेश कांबळे, भारती कांबळे अरविंद कुरणे, एम डी कांबळे, नागेश गिरी, बाबासाहेब कांबळे, शामराव कांबळे, चंद्रकांत सुर्यवंशी,अशोक हातकणंगलेकर,अमोल आकुर्डै, श्रीकांत कांबळे, प्रभाकर कांबळे, विनोद कांबळे, अरुण शिंगे, रंगराव प्रधान, महेश यमगरणी,माधव कांबळे, बी .के कांबळे सर कोल्हापूर ,व्ही एच कांबळे, सिद्धार्थ कांबळे ,संगीता कांबळे, प्रफुल लोखंडे, उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील विविध भागांतील कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी सातापा कांबळे बस्तवडेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत आगामी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!