महामाता भिमाई व त्याग माता रमाई यांचा आदर्श आजच्या स्त्रियांनी घ्यावा- प्रा. डॉ. गुरुनाथ सामंत

Share News

भारतीय बौद्ध महासभा व दलीत क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने यमगर्णी येथे त्याग माता रमाई व महामाता भीमाई यांची जयंती उत्साहात साजरी

कागल : यमगर्णी येथे माता रमाई व माता भीमाई यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समाजातील महिलांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
या नंतर सामूहिक त्रिसरण व पंचशीन ग्रहण करण्यात आले.

हुपरी येथे 10 व्या युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य यांच्या वतीने भंते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्या बद्दल समाजाच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय संघटक महेश धम्मरक्षित यांचा सत्कार करण्यात आला.
समाजातील मुलींनी वयक्तिक व सामूहिक नृत्यातून माता रमाई यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी कांबळे यांनी केले.

  या नंतर भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष साताप्पा कांबळे बस्तवडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्राध्यापक डॉ. गुरुनाथ सामंत हे उपस्थित होते. ते बोलताना म्हणाले की, गरिबी सोबत माता रमाई यांनी नेहमीच जवळच्या लोकांना गमावल्याचे दुःख बघितले आहे. पण त्या दुःखात खचून न जाता सोबतच्या लोकांना सावरून घेत संसाराचा गाडा चालविला. बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत मुलांचा सांभाळ केला. कशाची अपेक्षा केली नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या कार्यात खंड पडला नाही.

  या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा निपाणी तालुका अध्यक्ष प्रताप शितोळे, यमगर्णी ग्रामपंचायत सदस्य  उमेश पवार, तालुका संघटक प्रमोद जाधव, जिल्हा सल्लागार पंडित कांबळे, वसंत कांबळे, तेजेश कांबळे, बबन कांबळे, दिलीप कांबळे, तानाजी कांबळे,पवन देवदास, शैलजा माळगे, द्रोपदी जिरगे, सुखमाबाई जिरगे, संगीता कांबळे, शाराबाई कांबळे, लक्ष्मी मोहिते, पवित्र देवदास, भागीरथा घाटगे, गोदाबाई मोरे, अक्काताई जिरगे आदीसह माता रमाई महिला मंडळ, माता सावित्रीबाई महिला मंडळ व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच गावातील लहान मोठे उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा कांबळे तर आभार प्रदर्शन महेश धम्मरक्षित यांनी केले.

शेवटी धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!