पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देऊ: दिपक चव्हाण

Share News

शिवसेनेच्या वतीने श्री.दीपक चव्हाण यांचा निवडीबद्दल सत्कार..

कोल्हापूर : संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष पदावर निवड करून शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांनी कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय दिला असून पदाच्या माध्यमातून सर्व पात्र लाभार्थ्यांना न्याय देऊ, असे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजना समितीचे नवीन अध्यक्ष दिपक चव्हाण यांनी केले.
शिवालय, शिवसेना कार्यालय येथे युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव नगरसेवक ऋतुराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना चव्हाण यांनी, सर्वसामान्य कार्यकर्त्याला उच्च पदावर संधी देण्याचे कामं करणारा पक्ष म्हणजे शिवसेना असून संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष पदावर माझी निवड होणे ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून समाजातील निराधार, गरजू आणि वंचित घटकांची सेवा करण्याची मोठी संधी आहे.
या पदामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे, त्यांना न्याय आणि आधार मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने मी हे काम आणि समर्पित भावनेने पार पाडेन,असे सांगितले..

यावेळी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेविका सौ. मंगल साळोखे,उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे,रमेश खाडे,उदय भोसले,शहर समन्व्यक सुनिल जाधव, जिल्हा समन्वयक कमलाकर जगदाळे, महिला आघाडीच्या पूजा भोर,शहरप्रमुख सौ. सिद्धी रांगणेकर, सौ. अमरजा पाटील,सौ. प्रीती अतिग्रे,सौ. मंगल कुलकर्णी,सौ.राधिका पारखे,सौ. पूजा कामते,देवेंद्र खराडे,सनी अतिग्रे,सुरेश माने,किरण पाटील,सुशील भांदिगरे,अविनाश कामते,बाळासाहेब शेलार,अर्जुन संकपाळ,कपिल नाळे,जयदीप सरवदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!