
बस्तवडे (ता.कागल) : येथे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त ग्रामपंचायत मध्ये प्रतिमा पूजन करण्यात आले. गावातील पोस्ट ब्रँच मॅनेजर मयुरी कुराडे व विवेक कुंभार यांच्या हस् ते करण्यात आले. तर या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांनी केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून थोडक्यात मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाश शिंदे , कमलेश पाटील , संतोष पाटील , राजाराम माळी , युवराज देसाई , दत्तात्रय माळी व बबन वायदंडे इत्यादी प्रमुख हजर होते. तसेच संयुक्त नवीन वसाहत (माळवाडी) यांच्या वतीने शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. सुरुवातीस किल्ले भुदरगड येथुन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ज्योत आणली. या ज्योतीचे स्वागत वसाहत मधील माता बंधू-भगिनी यांनी स्वागत केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रकाश सुतार व शरद नरके व मुरगुड पोलीस स्टेशन कॉन्स्टेबल एन. पी. पाटील यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांनी उपस्थित लोकांचे स्वागत करून जयंतीनिमित्त सर्वांच्या वतीने अभिवादन केले.व छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास थोडक्यात सांगितला. यावेळी गजानन माळी, संतोष सुतार , महेश पाटील , प्रशांत सुतार , अनुराग कांबळे , प्रफुल भोसले , अभिजीत माळी , पृथ्वीराज भोसले , अनिकेत पाटील, सम्राट पाटील , हर्षवर्धन पाटील , श्रेयस कांबळे व अंगणवाडी सेविका सौ. वर्षा पाटील, शिल्पा कुंभार , मदतनीस शितल वायदंडे, मदतनीस शितल वायदंडे व अंगणवाडी मधील विद्यार्थी विद्यार्थिनी व मंडळाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी आभार अभिजीत कांबळे यांनी मांडले. यावेळी सर्वांना खाऊ वाटप करण्यात आला.तर संध्याकाळी मंडळाच्या वतीने हिप्नॉटिझम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तर बौद्ध समाज यांच्या वतीने बुद्ध विहार मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सुरुवातीस समाजातील लहान बांधवांनी परीसर स्वच्छता केली.व रांगोळी काढण्यात आली. यावेळी स्वागत व प्रास्ताविक नम्रता कांबळे यांनी केले. व तिने जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक गीत सादर केले. यावेळी माजी सैनिक मारुती कांबळे, एकनाथ कांबळे , महादेव शिंदे , विनोद कांबळे , पंडित कांबळे , विठ्ठल कांबळे , बाबुराव कांबळे , शितल माने , गौतम कांबळे , अक्षता कांबळे व समाजातील लहान बांधव मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी या सर्वांचे आभार सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांनी मांडले. व सर्वांना खाऊ वाटप केला.
