
कोल्हापूर : कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा कडून व जुनाराजवाडा,लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, व राजारामपुरी पोलीस ठाणे यांनी कोल्हापूर परिसरात वाढत चाललेल्या वाहतूक नियमानांच्या उल्लंघनांवर अंकुश ठेवण्यासाठी कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून आज मोठी कारवाई मोहीम राबवण्यात आली. तिब्बल सीट,वाहन चालवताना मोबाईल वापर म्युझिकल हॉर्न,कर्कश हॉर्न, प्रवेश बंद मार्गातून वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाहनांमध्ये मॉडीफिकेशन करणे, लायसन्स जवळ न बाळगणे, लायसन्स न काढणे, अल्पवयीन चालक यांचे पालकांचेवर , इतर केसेस आणि अडथळा निर्माण करणाऱ्या पार्किंगसह विविध उल्लंघनांवर ४०९ केसेस नोंदवून एकूण ३ लाख ४९ हजार ९५० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
दि १८ फेब्रुवारी सायंकाळी ७ पासून ते १९ फेब्रुवारी सकाळी ११ या कालावधीत अंमलदारांच्या पथकामार्फत ही मोहीम राबविण्यात आली वाढत असलेल्या बेजबाबदार वाहन चालक प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक ,अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली शिवाजीपूल तसेच विविध ठिकाणी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना नेमून विशेष मोहिमेद्वारे ही कारवाई करण्यात आली. अल्पवयीन चालकांच्या केसेस वर तब्बल १० हजार दंड आकारला गेला.तिब्बल सीट ,मोबाइल वापर, लायसन्स जवळ न बाळगणे ,म्युझिकल हॉर्न, कर्कश हॉर्न या इतर प्रकारांवर तडजोड शुल्क वसूल करण्यात आले

तसेच शहर वाहतूक शाखेकडून डुप्लिकेट सायलेंसर व कर्णकर्कश हॉर्न असलेली सुमारे ३२ वाहने ताब्यात घेऊन हॉर्न तसेच मोटार सायकलचे सायलेंसर बदलून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे ,पोलीस निरीक्षक डोके,पोलीस निरीक्षक कन्हेरकर, पोलीस निरीक्षक होडकर, पोलीस निरीक्षक लोंढे यांच्या निरीक्षणाखाली पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली.