
हुपरी ( ता. हातकणंगले) : हुपरी-इंगळी रस्त्यावरलगत खेमलापुरे यांच्या गोठयात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बैल आणि म्हशी ची स्वच्छता करीत असताना विजेचा धक्का लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धीरज सहदेव नाईक (व व २८ रा. विठ्ठल मंदिर ,हुपरी ता. हातकणंगले ,जि. कोल्हापूर ) आणि भगवान खडू सोनवणे ( व व ६५ रा. गणेश माळ , हुपरी, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर ) हे दोघे खेमलापुरे यांच्या गोठयात वाहन सर्व्हिसिंग मशीनच्या साहाय्याने पाण्याने जनावरांची स्वच्छता करीत असताना अचानक मशीन मध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने दोघांनाही विजेचा तीव्र धक्का बसला.विजेचा धक्का इतका जोरदार होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी समजताच परिसरात नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त झाली. दोघांना हुपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत घोषित केले. या घटनेची अकस्मात नोंद हुपरी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील अधिक तपास हुपरी पोलीस करीत आहेत.