
कोल्हापूर : आज देशभरात व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेचा उत्साह दिसून येत आहे. आपल्या जीवनातील दिशादर्शक असणाऱ्या गुरुचा सन्मान करण्यासाठी आणि गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण उत्साहात साजरा केला जात आहे.
कोल्हापूर युवा सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेबांचा गुरु पौर्णिमेनिमित्त सत्कार करण्यात आला.
राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना प्रत्येक युवा सैनिकाला समाजासाठी लढण्याची प्रेरणा आणि योग्य दिशा देण्याचं काम नेहमीच आमदार राजेश क्षीरसागर साहेब आणि सौ. वैशाली क्षीरसागर यांच्याकडून होत असते, साहेबांच्यामुळे प्रत्येक युवा सैनिकाला समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्याला योग्य न्याय देण्याची प्रेरणा मिळते, म्हणूनच अशा गुरुस्थानी असलेल्या व्यक्तिमत्वाला आज गुरु पौर्णिमेच्या निमित्त शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेण्यात आले. यावेळी युवा-युवतीसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.