सावळी येथे डॉल्बी मुक्त व पर्यावरणपूरक गणेश उत्सवासाठी कुपवाड पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली बैठक

Share News

कुपवाड : आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याच्या वतीने आज सावळी गावात गणेश मंडळांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत सहा. पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी गणेश मंडळांना डॉल्बी मुक्त, शांततापूर्ण व सुरक्षित उत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी गणेश मूर्ती स्थापना व विसर्जन काळात योग्य दक्षता घेणे, मिरवणुकांदरम्यान वाहतूक व्यवस्थापन आणि स्वयंसेवकांची नेमणूक याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले. गावातील विरशैव गणेश मंडळ व अमरकला गणेश मंडळ यांनी यंदाही मंडप व मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

बैठकीत प्रभारी अधिकारी दीपक भांडवलकर, संदीप घस्ते, तसेच सावळीतील १५ गणेश मंडळांचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत सर्व मंडळांनी पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रमांवर भर देणाऱ्या उत्सवासाठी एकमुखी ठराव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!