पट्टणकोडोली मध्ये गुटखा, सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्यावर हुपरी पोलिसांची कारवाई ,२६ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Share News

हुपरी ( ता हातकणंगले ) : हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पट्टणकोडोली येथील जाधव गल्लीतील शिंदे किराणा दुकानात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूची विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत आरोपी संदीप दगडू शिंदे (वय ४२, रा. पट्टणकोडोली) याच्या दुकानातून विविध प्रकारचा सुगंधी तंबाखू, पान मसाला व रोख रक्कम असा एकूण २६ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही आरोग्याला घातक पदार्थांची विक्री केल्याने तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याचा गंभीर मुद्दा पोलिसांनी अधोरेखित केला. तपास हुपरी पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!