
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात दिनांक ०६.०२.२०२६ रोजी बहुउद्देशीय हॉल रमणमळा, पोस्ट ऑफीस, कोल्हापूर या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चे करवीर तालुक्याचे सर्व कामकाज त्यामध्ये मतपेटया वाटप व दिनांक ०७.०२.२०२६ रोजी मतपेटी संकलन व दिनांक ०९.०२.२०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. सदर परिसरातील मोटार वाहनांची वाहतुक सुरळीत व सुरक्षित ठेवण्या करिता तसेच नागरिक, मोटार वाहन चालक व रहिवाशी यांना सुरक्षितता प्रस्थापित व्हावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी मतमोजणी केंद्र असलेल्या परीसरातील वाहतुकीस (शासकीय व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळून) प्रवेश बंद करण्यात येत आहे व तेथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे. त्या अनुशंगाने मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, खालीलप्रमाणे आवश्यक ते निर्देश दिले आहेत.
बहुउद्देशीय हॉल रमणमाळा, या ठिकाणचे वाहतूक नियमन :-
दिनांक ०६.०२.२०२६ रोजी सकाळी ०८.०० ते मतपेटया वाटप होईतोपर्यंत व दि. ०७.०२.२०२६ रोजी सायंकाळी ०७.०० वा. ते मतपेटया जमा होईतोपर्यंत चे रहदारी नियमानाबाबत.
(अ) प्रवेश बंद मार्ग –
अत्यावश्यक सेवेतील पोलीस, अॅम्ब्युलनस, फायरब्रिगेड तसेच स्थानिक रहिवाशी यांची वाहने खेरीज करुन
१) जिल्हा व सत्र न्यायालय ते रमणमळा पोस्ट ऑफीस चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
२) पितळी गणपती मंदीर ते पोलीस अधीक्षक कार्यालय चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
३) महावीर कॉलेज ते कसबा बावडा जाणारा रस्ता पोस्ट ऑफीस चौक येथून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
(ब) वळविण्यात आलेले मार्ग –
१) कसबा बावडा कडून सीपीआर कडे जाणारे वाहनांनी भगवा चौक अगर जिल्हा व सत्र न्यायालय चौक येथून लाईन बजार मार्गे पुढे मार्गस्थ होणेचे आहे.
२) धैर्यप्रसाद चौकाकडून कसबा बावडा कडे जाणारे वाहनांनी लाईन बझार मार्गे मार्गस्थ होणेचे आहे.
(क) निवडणूक कामकाज साठी येणाऱ्या एस.टी बसेस व चारचाकी वाहनांसाठी मार्ग :
१) निवडणुकीच्या कामाकाजासाठी येणाऱ्या एस.टी बसेस, ट्रॅव्हलर, जीप या वाहनांनी धैर्यप्रसाद चौक, पितळी गणपती पोलीस अधीक्षक, कार्यालय या मार्गाचा किंवा मार्गे दसरा चौक अगर सीपीआर ते महावीर कॉलेज ते रमणमळा या मार्गाचा वापर करावा.
२) मतदान संपल्यानंतर मतपेट्या केंद्रावर जमा करण्याकरीता येणारी सर्व एस.टी बसेस, ट्रॅव्हलर, जीप वाहने त्याच (वर नमुद) मार्गाचा वापर करतील.
(ड) निवडणूक कामकाज साठी येणाऱ्या अधिकारी/कर्मचारी तसेच एस. टी. बस, ट्रॅव्हलर जीप पार्किंग सुविधा :-
१) निवडणुक प्रक्रियेसाठी येणारे अधिकारी व कर्मचारी यांनी आपली वाहने रहदारीच्या रस्त्यावर कोठेही पार्क करुन नयेत, त्यांना वाहन पार्किंगसाठी पोलीस मुख्यालय प्रवेशव्दार लगतचे पार्किंग, अंलकार हॉल, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आतील परीसर या जागेचा वापर करावा.
२) मतपेटया घेवून जाणेसाठी येणा-या एस.टी. बसेस व इतर वाहने यांचेकरीता धोबीघाट समोरील रिकाम्या जागेचा पार्कीग करीता वापर करावा.
३) महागावकर शाळा येथे जिल्हा व सत्र न्यायालया समोर
शासकीय धान्य गोडावून जवळील बहुउददेशीय हॉल रमणमळा ठिकाणचे वाहतूक नियमन
दिनांक ०९.०२.२०२६ रोजी सकाळी ०५.०० वा. पासुन मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होवुन गर्दी संपे पावेतो देण्यात येत आहेत.
वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात व वळविण्यात येणारे मार्ग :-
(अत्यावश्यक सेवेतील पोलीस, अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड यांची वाहने खेरीज करुन)
१) सीपीआर चौक ते कसबा बावडा कडे जाणारे सर्व वाहनांना महावीर कॉलेज चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी पाटलाचा वाडा, कलेक्टर ऑफिस चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
२) पितळी गणपती चौक ते एस.पी. ऑफिस चौक जाण्यास व येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना पितळी गणपती या ठिकाणी प्रवेश बंद करणेत येत आहे. सदर वाहनांनी धैर्यप्रसाद चौक, सर्कीट हाऊस मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
३) कसबा बावडयाकडुन पोस्ट ऑफिस मार्गे सीपीआर कडे जाणा-या सर्व वाहनांना ४ नं. फाटक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी लाईन बाजार चौक, सर्कीट हाऊस मार्गे पुढे मार्गस्थ व्हावे.
४) रमण मळयातून येवून ड्रिमवर्ल्डचे पाठीमागील रोडने धोबी कट्टा पर्यंत ये-जा करणेस तसेच रमणमळा येथील पवार बंगल्याकडून धान्य गोडवूनकडे जाणेस तसेच रमणमळा येथील पवार बंगल्याकडून धान्य गोडावूनकडे जाणेस सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंद करणेत येत आहे.
पार्किंग सुविधा –
अ) मतमोजणी करीता आलेले अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी यांचे वाहनासाठी पार्किंग
१) पोलीस मुख्यालय गार्डन समोरील रिकामी जागा या ठिकाणी करण्यात येत आहे.
ब) निवडणुक निकाल पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहन पार्किंग :-
२) रेणुका मंदिर पाठीमागील बाजू १०० फुटी रोडवर (दुचाकी व चारचाकी वाहनांकरीता)
३) ४ नं. शाळेचे मैदान (दुचाकी वाहनांकरीता)
४) शिंदे नर्सरी समोरील रस्त्याचे पलीकडील आत जाणारे रस्त्याचे डावे बाजुस (चारचाकी वाहनांकरीता)
(क) रमणमळा परिसरातील स्थानिक रहिवाश्यांकरिता सुचना :-
१) यशवंत सोसायटी पोवार मळा या भागातील रहिवाशांनी येण्या जाण्यासाठी १०० फुटी रोडचा वापर करावा.
२) रमणमळा, जावडेकर सोसायटी, तसेच छ. शाहू हायस्कूल परिसरातील लोकांनी येण्या जाण्यासाठी पोलो ग्राऊंड, छ. शाहू हायस्कूल, महावीर कॉलेज किंवा प्राणी संग्रहालय पाठीमागील फाटक ते महावीर कॉलेज या मार्गाचा वापर करावा.
वरील निर्देश हे दिनांक ०६.०२.२०२६ रोजी सकाळी ०८.०० ते मतपेट्या वाटप होईतोपर्यत व दि. ०७.०२.२०२६ रोजी सायंकाळी ०७.०० वा. ते मतपेट्या जमा होईतोपर्यत तसेच दिनांक ०९.०२.२०२६ रोजी सकाळी ०५.०० वा. पासुन मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होवुन गर्दी संपे पावेतो देण्यात येत आहेत.असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे.