स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कुपवाड पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई, कुपवाड खून प्रकरणातील तीन संशयित आरोपी जेरबंद

Share News

कुपवाड : रामकृष्णनगर येथे अमोल सुरेश रायते (वय ३५) या तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली व कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. काल रात्रीच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिराजवळ अमोल रायते याच्यावर कुऱ्हाड व चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी प्रेम बाळासाहेब मद्रासी (वय २४) आणि तेजस संजय रजपूत (वय २५, दोघे रा. रामकृष्णनगर, कुपवाड) व निहाल आसिफ बावा ( वय २०, रा. शामराव नगर, सांगली) यांना तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदाराच्या आधारे सावळी ते तानंग रस्त्यावरून अटक करण्यात आली.

सदर आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. पथकातील पोलीस सागर लवटे आणि अमीरशा फकीर यांना प्राप्त झालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ही अटक केली गेली.

चौकशी दरम्यान संशयित आरोपी प्रेम मद्रासी याने अमोल रायते हा आपल्या पत्नीबाबत अपशब्द वापरत असल्यामुळे वाद झाला, व त्यातून इतर संशयितासह मिळून अमोल रायतेचा खून केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना पुढील तपासासाठी कुपवाड औद्योगिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या संयुक्त कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेल्या भीतीचे वातावरण काहीसे निवळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!