
कोल्हापूर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत आज भवानी मंडप ते छ.शिवाजी चौक सी पी. आर ते खानविलकर पेंट्रोल पंप ते पोलीस अधिक्षक कार्यालय ते कसबा बावडा शुगर मिल पर्यंत तसेच दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर दाभोळकर कॉर्नर ते कावळा नाका व मिरजकर तिकटी ते बागल चौक जनत बाजार उमा टॉकीज लक्ष्मीपुरी येथील मेन रोडवरील विना परवाना अनाधीकृत लावण्यात आलेल्या सदर ठिकाणावरुन 5 हातगाड्या, 2 केबिन , 186 स्टॕण्ड बोर्ड , 22 छत्री ’15 वजन काटे , 12 स्टॕच्यू ,12 स्टुल जप्त करण्यात आले.
सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे,शिल्पा दरेकर सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर व शहर वहातुक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे P. S I बागल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, सहायक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत मुकादम रविंद्र कांबळे अतिक्रमण कर्मचारी व राजारामपुरी वॉर्ड व गांधी मैदान कर्मचारी -यांच्या मार्फत करण्यात आली.
तरी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने येथून पुढेही कोल्हापूर शहरामध्ये अनाधिकृत फेरीवाले व रोडवरील दुकाना बाहेर आलेल्या अनाधिकृत शेडवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे दुकान धारकांनी व फेरीवाल्यांनी आपले अनाधिकृत असलेले अतिक्रमण स्वत: काढून घ्यावे तसेच दुकानाबाहेर पार्कीग च्या ठिकाणी लावणेत आलेली स्टॕण्ड बोर्ड कोणीही लावू नये अन्यथा जप्त करणेत असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.