
शिराळा : २९ जुलै २०२५ रोजी पार पडणाऱ्या नागपंचमी यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतूक मार्गात मोठा बदल करण्यात आला आहे. सांगलीच्या अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी हा आदेश जारी केला आहे.
पुढील वाहतूक बदल लागू असतील –
(१) राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील पेठनाक्यावरून सर्व वाहने एकेरी मार्गाने शिराळ्याकडे जातील, तर कोकरूड, मांगले, सागायकडे जाणारी वाहने निकम मळा कापरी फाटा बायपासने वळवण्यात येतील.
(२) शिराळाहून महामार्ग क्र. ४ कडे जाणारी वाहने शिराळा बायपासमार्गे कापरी, कार्वे, उगेवाडी, ऐतवडे बुद्रुक, लाडेगाव, वशीमार्गे येडेनिपाणी फाट्याकडे वळवण्यात येतील.
(३) शिराळा बायपास येथून पेठनाका दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहील.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान सुरळीत वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.