
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील काही भागात कृष्णा नदीच्या वाढत्या पाण्यामुळे पूरस्थिती गंभीर होत चालली असून, प्रशासनाने संभाव्य बाधित भागातील नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.
महापालिकेचे सहायक आयुक्त सहदेव कावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी आपल्या भागातील पाण्याची पातळी वाढल्याची वाट न पाहता स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी हलावे, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
पूरपातळी आणि संभाव्य बाधित भाग खालीलप्रमाणे –
🔹 30.0 फुट – सूर्यवंशी प्लॉट
🔹 31.0 फुट – इनामदार प्लॉट (शिवनगर)
🔹 32.1 फुट – कर्नाळ रोड परिसर
🔹 32.5 फुट – शिवमंदिर परिसर, बायपास चौक
🔹 34.0 फुट – काकानगर समोरील घरे
🔹 35.0 फुट – दत्तनगर परिसर
🔹 39.0 फुट – मगरमच्छ कॉलनी 1
🔹 40.0 फुट – मगरमच्छ कॉलनी 2
प्रशासनाने नागरिकांना कोणतीही जोखीम न पत्करता तातडीने हलवण्याचे आवाहन केले असून, गरज भासल्यास सहदेव कावडे (सहाय्यक आयुक्त) – ९२७२१ २६५६८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.