
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे चेअरमन मा.नविद मुश्रीफ साहेब यांनी गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील बेडवा दूध उत्पादक सहकारी संस्थेला नुकतीच अभ्यासपूर्वक भेट दिली. या भेटीप्रसंगी गोकुळचे संचालक मा. विश्वास पाटील, कार्यकारी संचालक श्री. योगेश गोडबोले, तसेच एन. डी. डी. बी. (NDDB) चे अधिकारी उपस्थित होते.
संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी गोकुळच्या प्रतिनिधींना संस्थेची कार्यपद्धती, ISO 9001:2015 प्रमाणन, दररोजचे सुमारे 11,700 लिटर दुध संकलन, सभासद सहभाग व तांत्रिक व्यवस्थापन यांची सविस्तर माहिती दिली.
गोकुळच्या शिष्टमंडळाने संस्थेतील आधुनिक प्रक्रिया, शिस्तबद्ध कारभार आणि ग्रामीण पातळीवरील संघटन कौशल्य यांचा सखोल अभ्यास केला.
या दौऱ्याचा उद्देश इतर राज्यांतील यशस्वी दुग्ध संस्थांच्या कार्यपद्धतीचा अनुभव घेऊन गोकुळमध्ये अधिक कार्यक्षम, पारदर्शक व आधुनिक व्यवस्थापन राबवणे हाच होता.
ही भेट आनंद येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) येथे आयोजित बैठकीदरम्यान पार पडली.
यावेळी एन.बी.बी.डी. व अमुलचे अधिकारी उपस्थित होते.