थ्री स्टार एक्सपोर्ट हाऊस श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट निर्यात कामगिरी केल्याबद्दल उमेद सायझर्सला सुवर्ण पदक प्रदान

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्कार घेताना उमेद ग्रुपचे सतीश मालू, नितीन मालू आदी मान्यवर

कुपवाड – उमेद साइझर्स कुपवाड ला फिओ (भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने स्थापित) पश्चिम विभागातील (महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा ) चे थ्री स्टार एक्सपोर्ट हाऊस श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट निर्यात कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते 22 जून रोजी ताजमहाल पॅलेस, मुंबई येथे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.

यापूर्वी उमेद साइजर्स यांना महाराष्ट्र शासनाकडून 13 वेळा निर्यातीचे सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्तेही निर्यात श्री पुरस्कारही प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच वेस्टर्न रिजनचे निर्यातीचे पुरस्कारही मिळालेले आहेत. उमेद साइजर्स ही कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील थ्री स्टार एक्सपोर्ट हाऊस नामांकन कंपनी असून सदर कंपनी ही आयएसओ ९००१-२०१५ आहे. सदर कंपनी ऑर्गनिक कॉटनचे कापडाचेही उत्पादन करणारी व क्रिसील रेटेड कंपनी आहे. यशस्‍वी गरूडझेप घेत उमेद समुहाने जिल्ह्याच्या औद्योगिक जडणघडणीतही यशाचा मानाचा तुरा खोवला आहे .

सदर कंपनी ही उमेद ग्रुपचे चेअरमन नेमीचंद मालू व मालू कुटुंबियाच्या मार्गदर्शनाखाली चालविली जाते. सदरचा पुरस्कार हा मालू कुटुंबीयांनी आपला स्टाफ व सर्व कामगारांना अर्पण केला आहे. कर्मचारी यांचे परिश्रम, उत्‍कृष्‍ट नियोजन आणि एकोपा असल्यामुळे उमेद ग्रुपला सदरचे यश मिळाले आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!