कुपवाड – औद्योगिक वसाहतीमधील सुमारे १६ कि.मी. रस्त्याचे काम वेळेत आणि दर्जेदार पध्दतीने केल्याबद्दल कृष्णा व्हॅली चेंबरचे सभासद आणि उद्योजकाच्या वतीने म. औ.वि. महामंडळाचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक, उप अभियंता अशोक पाटील, कनिष्ठ अभियत्ता सुयोग तपकिरे, रस्त्याचे ठेकेदार जयराम कुकरेजा, शकील गायबान नवनियुक्त सहा पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर यांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविकामध्ये बोलताना मालू म्हणाले की, गेल्या काही वर्षापासून रस्त्याचे काम प्रलंबित होते. रस्त्याच्या कामासाठी कृष्णा व्हॅली चेंबरने वारंवार उद्योगमंत्री, स्थानिक आमदार, म. औ.वि. महामंडळ ऑफिस मुंबई, सागली यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली होती. सदर पाठपुराव्याचा विचार करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक यांनी सदरच्या पाठपुराव्याचा विचार करून रस्त्याचे काम मार्गी लावण्यात मोलाचा वाटा होता. रस्त्याचे काम अतंत्य चांगल्या पध्दतीचे आणि दर्जेदार पध्दतीच झाल्यामुळे उद्योजक व कामगार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
नवनियुक्त सहा. पोलीस निरीक्षक भांडवलकर म्हणाले की, कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकाना आमचे नेहमीच सहकार्य राहणार आहे. कोणाला काहीही तक्रार करायची असेल तर कोणतीही भिती न बाळगता आमच्याकडे यावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आभार संस्थेच उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे यांनी मानले. यावेळी संस्थेचे सचिव गुंडू एरंडोले, संचालक दिपक मर्दा, हरीभाऊ गुरव, बी. एस. पाटील, अरूण भगत, हेमलता शिंदे, रागिणी पाटील, पांडुरंग रूपनर राजगोंडा पाटील, दिनेश पटेल, उद्योजक फुलचंद शिंदे, उपेन पटेल, अनिल कांबळे, अशोक दिपू, व्यवस्थापक अमोल पाटील, विविध कंपन्यांचे पदाधिकारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.